फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण):-
नुकत्याच परपडलेल्या लोकसभेच्या निवडणुकी वेळी काही गैरसमजुतीमुळे राजे गटापासून दुरावलेले फलटण शहरातील शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच फलटण नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य पैलवान राहुल निंबाळकर व यूवा उद्योजक श्रीकांत पालकर यांनी काल त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत (राजे गट)राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी यूवा नेते सह्याद्री कदम, यूवा नेते महेंद्र बेडके उपस्थित होते.
राजे गटाचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही गैरसमजुतीमुळे राजे गटापासून ते दुरावले होते.अल्पावधीतच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा राजे गटात प्रवेश केल्याने शहारमध्ये राजे गटाची ताकद वाढली असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांचा प्रचार जोमाने करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे मनोगत जाहीर प्रवेशानंतर पत्रकारांजवळ व्यक्त केले.