दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करत असताना डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी व इतर
फलटण टुडे (बारामती प्रतिनिधी)::-
आत्याधुनिक तंत्रज्ञान च्या युगामध्ये सुद्धा अध्यात्म म्हतपूर्ण आहे त्यामुळेच श्री क्षेत्र काशी या ठिकाणी जगभरातून विविध धर्मातील विद्वान अभ्यास व शिक्षण घेण्यासाठी येतात.
अध्यात्माच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी अपेक्षा
श्री क्षेत्र काशी येथील प.पू. जगद्गुरु श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केली.
शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी
बारामती मध्ये वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने आयोजित डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचा दर्शन सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्तीत भाविक यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अध्यात्मिक व विज्ञानवादी भूमिका स्पष्ट केली.
या वेळी वीरशेव लिंगायत समाज ट्रस्ट चे समीर ढोले,मा. नगरसेवक सुभाष ढोले, सुनील डोंबे व सुभाष ममाने, अभिजित गाढवे,आनंद पानसरे, सुनील हिंगाणे, देवा बोधे, माधुरी झाडबुके व इतर मान्यवर उपस्तीत होते
२००५ साली श्रावणमास तपोअनुष्ठान निमित्त जमा झालेली देणगी व तुलाभर आणि बारामती मधील दोन दिवसांच्या वास्तव्य मधून भक्तांकडून प्राप्त देणगी मधून शिक्षण निधी उभा करून आर्थिक दृष्ट्या गरीब परंतु हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करावी अशी सूचना करून शिक्षणाची गंगा अव्यातपणे सुरू ठेवावी असे सांगून श्री क्षेत्र काशीचे महत्व व जीवनात सत्संगाचे फायदे या विषयी माहिती सांगितली.
बारामती मध्ये समाजाच्या वतीने विद्यार्थी साठी विविध उपक्रम राबवले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.