फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण)::-
सातारा जिल्ह्यातील फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत वारंवार वाहतुक कोंडी होत असल्याने मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री धस सो यांनी फलटण शहर पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक शहा सो यांना वाहतुक केसेस करणे बाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे दिनांक २८/१०/२०२४ रोजी पोनि शहा सो यांनी पोलिस निरीक्षक नलवडे सो यांना आदेशित केले होते.
त्याप्रमाणे आज कोऴकि तिकाटणे तसेच फलटण शहर बस स्थानक याठिकाणी पोलिस निरीक्षक नलवडे सो, पोलिस उपनिरीक्षक जगताप सो, पोलीस अंमलदार स्वप्निल खराडे, ट्राफिक पोलीस अंमलदार संभाजी जगताप व आरसिपी पथक यांनी नाकाबंदी राबवुन बेशिस्त वाहन चालकाकडुन २१ हजार ६०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे