वेतन करार प्रसंगी कंपनीचे अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी
(छायाचित्र: सावळेपाटील)
फलटण टुडे न्यूज़ नेटवर्क (बारामती)::-
बारामती औद्योगिक वसाहत मधील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये कामगार आणि क्लार्क बंधूंसाठी, सन २०२४ ते २०२७ साठी त्रैवार्षिक वेतनवाढ करार गुरुवार दि.२८ नोव्हेंबर २४ रोजी यशस्वीपणे संपन्न झाला.
सदर कराराची अंमलबजावणी
१ एप्रिल २०२४ पासून होणार असून कामगार आणि क्लार्क बंधूंना प्रत्यक्षपणे रू १०३०७ तर अप्रत्यक्षपणे रू १३४५० एवढी वेतनवाढ करण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले आहे.
१ एप्रिल२०२४ पासून वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कामगार व क्लार्क बंधूंना रू ५१००० बक्षीस देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच घरभाडे भत्ता २२% करण्यात आलेला आहे.
प्रवास भत्त्यामध्ये रू १००० ने वाढ करण्यात आली आहे.
सध्या सणाची उचल रू ६००० मिळत आहे,त्यामध्ये वाढ करून रू. १०,००० करण्यात आली आहे.
वार्षिक वेतनवाढ रू ७ प्रतिदिन एवढी वाढवण्यात आली आहे.
सहल भत्ता रू १००० बोनस सोबत देण्याची प्रथा होती त्यामध्ये बदल करून सन २०२५ पासून एप्रिल महिन्याच्या पगाराबरोबर देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील काळात सेवानिवृत्त होणाऱ्या जास्तीत जास्त कामगार व क्लार्क बंधूंना याचा फायदा होणार आहे.
मेडिकल असिस्टंट फंड आई-वडिलांच्या आजारपणासाठी ठेवलेला असून त्यामध्ये स्पोर्ट फंडाची रक्कम रू. ५०,००० जमा करण्यात आलेली आहे.
कंपनीमध्ये काम करताना किरकोळ दुखापत झाल्यास पूर्वी चौथ्या दिवसापासून ५०% पगार मिळत होता, तो आता तिसऱ्या दिवसापासून देण्याचे ठरविण्यात आले आहे.
वेतनवाढ कराराच्या फरकापोटी दिली जाणारी रक्कम हि एप्रिल २०२४ पासुन देण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आलेले आहे.
सदरचा वेतनवाढ करार यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने तनेश धिंग्रा – कार्यकारी उपाध्यक्ष, झाकीर शेख – वरिष्ठ उपाध्यक्ष,
ई आर, विलास खरात- महाव्यवस्थापक ई आर, अतुल कोटांगळे – उपमहाव्यवस्थापक ई आर, विशाल शिंदे – उपव्यवस्थापक ई आर, तसेच
कामगार संघटनेचे अध्यक्ष कल्याण कदम , गुरुदेव सरोदे – सेक्रेटरी, शिवाजी खामगळ- उपाध्यक्ष, रवींद्र गिरमकर – खजिनदार, सल्लागार-संतोष साळवे, रमेश लोखंडे, सदस्य-सुरेश दरेकर, संजय सस्ते, सुनील पोंदकुले, यांनी वेतन करार यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून सदर करार विक्रमी असल्याचे संघटनेच्या वतीने कल्याण कदम व गुरुदेव सरोदे व इतर पदाधिकारी यांनी सांगितले.