संस्कार झगडे व प्रेम देवकाते
फलटण टुडे न्यूज़ नेटवर्क (बारामती)::-
ऑस्ट्रेलिया मध्ये देशात क्वीन्सलँड येथे ०६ जानेवारी ते १५ जानेवारी, २०२५ या कालावधीत होणाऱ्या २६ व्या ऑस्ट्रेलियन जांबोरीमध्ये भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय मुख्यालय,दिल्ली यांच्यामार्फत सहभागी होण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून ०२ स्काउट्स आणि ०१ युनिट लीडरची निवड करताना आली.यामध्ये जांबोरीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बारामती येथील ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ज्ञानसागर स्कूलमधील राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी संस्कार अमोल झगडे व राजस्थान राष्ट्रीय जांबोरीतील सहभागी विद्यार्थी प्रेम दादासाहेब देवकाते या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.जून 2024 साली भारत स्काउट-गाइड राष्ट्रीय मुख्यालय, दिल्ली या कार्यालयाकडे महाराष्ट्र राज्य स्काउट-गाइड यांच्या वतीने ज्ञानसागराच्या राज्य पुरस्कार प्राप्त पंतप्रधान ढाल स्पर्धेत सहभागी व राजस्थान राष्ट्रीय जांबोरीतील सहभागी विद्यार्थी यातील सहभागी विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर दि. १८ नोव्हेंबर २०२४ ला भारत स्काउट-गाइड राष्ट्रीय मुख्यालय, दिल्ली यांच्या कार्यालयाकडून संस्कार अमोल झगडे, प्रेम दादासाहेब देवकाते व युनिट लीडर प्रा. सागर मानसिंग आटोळे यांची निवड करण्यात आली. या २६ व्या ऑस्ट्रेलिया जांबोरी स्पर्धेत जगातील सर्व देशातील काही ठराविक विद्यार्थ्यांची निवड करून त्या विद्यार्थ्यांना या जांबोरीतील विविध स्पर्धेत सहभागी करून घेतले जाते. सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला बोर्डाच्या परीक्षेत १५ वाढीव गुण दिले जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्यावतीने, शाळेच्यावतीने व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांच्यावतीने कौतुक करण्यात येत आहे.