फलटण टुडे न्यूज़ नेटवर्क : –
हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने सब ज्युनियर महिलाचे पिंपरी चिंचवड येथील एस्ट्रोटर्फ मैदानावराती महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता दि हॉकी सातारा संघटनेच्या व फलटण एजुकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल च्या हॉकी खेळाडूचे सब ज्युनियर मध्ये कु तेजस्विनी कर्वे कु श्रेया चव्हाण कु अनुष्का केंजळे कु निकिता वेताळ अशा चार खेळाडूंची निवड झालेली होती. त्यातील कु निकिता वेताळ व कु तेजस्विनी कर्वे यांची सिकंदराबाद येथे होणाऱ्या सब ज्युनिअर महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या हॉकी संघामध्ये निवड झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानचा तुरा रोवला गेल्याची माहिती दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक तथा तालुका क्रिडा अधिकारी (नि.) श्री महेश खुटाळे यांनी माहिती दिली.
या सर्व खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे सर व हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ सर प्रशिक्षण देत आहेत.
तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून श्री बीबी खुरंगे सर, सहाय्य करत आहेत.
सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकरसाहेब महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकरसाहेब, मधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री सुधीर अहिवळे सर व दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री बाहुबली शहा, व इतर पदाधिकारी श्री पंकज पवार श्री प्रवीण गाडे, श्री विजय मोहिते,श्री महेंद्र जाधव श्री सचिन लाळगे व माजी राष्ट्रीय खेळाडू श्री शिरीष वेलणकर,श्री सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.