विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (जळोची):-
सद्गुरु श्री वामनराव पै शिक्षण संस्था च्या चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी, कटफळ, येथे १ डिसेंबर
जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांना एड्स आजार संबधीत जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती सत्र आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
सकाळच्या सत्रामध्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. विनोद पवार यांनी विद्यार्थ्याना एचआयव्ही व्हायरस, त्याचा प्रसार, एड्स रोग त्याचा प्रसार आणि नियंत्रण याची शास्त्रीय दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी रेड रिबन लावून एडस् रुग्णा बाबतीत संवेदना दाखवत “एड्स, एचआयव्ही- प्रसार आणि नियंत्रण” या विषयावर पोस्टर बनवून प्रदर्शनात सहभाग घेतला.
या पोस्टर प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वचैतन्य आयुर्वेद रसशाळा या औषध कंपनीचे व्यवसथापकीय संचालक आणि बारामती मधील प्रसिद्ध डॉ श्रीमंत खाडे तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. संग्राम मोकाशी,विश्वस्त नानासाहेब मोकाशी, सौ. संगीता मोकाशी, सौ. श्रद्धा मोकाशी उपस्थित होते.
मान्यवरांनी पोस्टर वरील आजाराची माहिती आणि त्याचे सादरीकरण पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले असेच विद्यार्थ्यांना एड्ससंदर्भात जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय संदर्भात मार्गदर्शन केले. यातून विद्यार्थ्यांची सृजनशीलता, नेतृत्व आणि संभाषण कौशल्य कौशल्ये विकसित होण्यास मदत होते असे डॉ. खाडे यांनी मत व्यक्त केले.
या प्रदर्शनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी नियोजन केले.