लिस्सी रोएंत्स्च आणि कार्ल कंडझिया यांच्या समवेत वरे परिववार
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):-
मळद येथील कृषीभूषण प्रल्हाद वरे यांच्या घरी नेदरलँड्स येथील लिस्सी रोएंत्स्च आणि कार्ल कंडझिया यांनी (नेदरलँडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲप्लाइड सायन्स व्हॅन हॉल लॅरेन्स्टीनमधील विद्यार्थी)
भेट देऊन बारामती परिसरातील
शेतकरी व शेतीला हवामान बदल, मार्केटिंग विषयी येत असलेल्या अडचणी बाबत चर्चा केली.
लिव्हिंग लॅब क्लायमेट रेझिलिएंट याविषयी ॲग्रीकल्चर बारामती येथे इंटर्नशिप करत आहेत. लिव्हिंग लॅबची कल्पना एक व्यासपीठ तयार करणे आहे, जिथे भिन्न कौशल्य आणि अनुभव असलेले लोक एकत्रितपणे निराकरणासाठी कार्य करू शकतात. त्यांची असाइनमेंट एक अन्वेषणात्मक अभ्यास करणे आहे, याचा अर्थ ते गावाबद्दल माहिती गोळा करून शेतकऱ्यांचे विचार आणि येत असलेल्या अडचणी समजून घेतात. हा सर्व डाटा गोळा करून ते त्यांच्या नेदरलँड्स येथील पर्यवेक्षकांना देणार आहेत, जेणेकरून भविष्यात ते महाराष्ट्रातील शेतीसाठी एक प्रकल्प डिझाइन तयार करणार आहेत. ते बारामती तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अगोदरच भेटले आहेत, तर काहींना भेटणार आहेत. त्यांची इंटर्नसिप फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत चालणार आहे, नंतर ते नेदरलँड्स ला जाऊन तेथील वरिष्ठ शास्त्रज्ञांकडे देऊन प्रकल्प डिझाईन तयार करणार आहेत. याप्रसंगी माझ्या सह, बाळासाहेब वरे, अक्षय सुभेदार व आकाश वळकुंदे आदी उपस्थित होते.