श्री स्वामी समर्थ
फलटण टुडे (बारामती):-
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित केंद्र जळोची बारामती यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र वाचन व अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन रविवार ०८ डिसेंबर ते सोमवार १६ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे .
या मध्ये रविवार ०८ डिसेंबर रोजी ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी. सोमवार ०९ डिसेंबर रोजी मंडळ स्थापना ,अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, मंगळवार १० डिसेंबर रोजी नित्यस्वाहार श्री गणेश याग ,श्री मनोबोध याग, बुधवारी नित्य स्वाहाकार ,श्री गीताई याग, गुरुवारी नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग, शुक्रवारी नित्य स्वाहाकार श्री चंडीयाग ,शनिवारी नित्य स्वाहाकार श्री रुद्र याग ,मल्हारी याग, रविवारी नित्य स्वाहाकार बलिपूर्णाहुती व दुपारी १२:३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव
सोमवार १६ डिसेंबर श्री सत्यपद पूजन देवता विसर्जन अखंड नाम जप जप यज्ञ सप्ताह सांगता.
सदर कार्यक्रम नाना नानी पार्क श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिवाजीनगर भिगवन रोड जळोची या ठिकाणी होणार आहे
सप्ताह काळात विनामूल्य मार्गदर्शन होणार आहे या मध्ये वास्तुशास्त्र, देवघर ,आडनावानुसार कुलदेवीतील व कुलदैवत, गोत्र ,वंश, कुलदैवत कुलदेवतेची सेवा मानसन्मान, पितरांची सेवा, पित्र दोषापासून मुक्तता ,ग्रामदैवत सेवा, शेतीचे उत्पन्न वाढण्यासाठी तोडगे, व्यसनी माणसाचे व्यसन घालवण्यासाठी तोडगा ,वर्षातील सण वार वृत्त वैकल्य कसे साजरे करावे ,सेंद्रिय व आध्यात्मिक शेती कुटुंबातील वादविवाद यावर तोडगा मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत समस्या मार्गदर्शन आदी विषयावर वर या ठिकाणी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे
तरी भाविकांनी उपस्तीत राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जळोची यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.