वर्धापन दिनी खेळाडूंना टी शर्ट चे वाटप करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , शिवाजीराव घोरपडे,अतुल शेलार व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा(फलटण दि ०८):-
फलटण एजुकेशन सोसायटी सलग्न क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन फलटण यांच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल फलटण येथे मंगळवार दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनी क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन क्लब फलटण मधील ७० खेळाडूंना फलटण येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला नामांकित ब्रँड गोविंद मिल्क अँड मिल्क डेअरी च्या माध्यमातून टी शर्ट चे वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटी च्या क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव घोरपडे, छत्रपती अवॉर्ड् विजेते श्री अतुल शेलार , मुधोजीचे माजी प्राचार्य श्री बाबासाहेब गंगावणे , फलटण एज्युकेशन सोसायटी च्या क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ , प्रवीण जाधव, श्री गणेश भिसे ,या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रिकेट ॲकॅडमी चॅम्पियन फलटणचा वर्धापन दिन साजरा झाला.