डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज: पी एन रणवरे

फलटण टुडे वृत्तसेवा :-

आयुष्यभर संघर्ष करून माणसाला माणूस पण देणारा महामानव म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वाचनाने माणूस घडतो हे आपणास शिकार मिळते त्यामुळे आपणाकडे वाचन संस्कृती वाढणे काळाची गरज आहे. जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून त्यांनी भारतीय संविधान निर्माण केले. या संविधानावर तेच आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे सुरू आहे. हेच आपल्या लोकशाहीचे यश आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान मानले जाते याचे सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज आहे, असे मत स्कूल कमिटीचे सदस्य पी एन रणवरे यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र दौलतराव रणवरे महादेव रणवरे, नवनाथ रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती भाषणे केली. यावेळी भारत सरकार माध्यमिक व उच्च शिक्षण विभाग संलग्न हिंदी राष्ट्रभाषा विचार समिती यांच्यावतीने आयोजित केलेल्या हिंदी परीक्षेमध्ये विद्यालयातील कुमारी शिफा तांबोळी, श्रेया रणवरे, शर्वरी रणवरे यांना राष्ट्रीय भाषा पुरस्कार मिळाल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते मेडल प्रमाणपत्र व एक पुस्तक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ पौर्णिमा जगताप यांनी केले सौ गौरी जगदाळे यांनी मानले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!