जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे संघास उपविजेते पद
फलटण टुडे वृत्तसेवा :-
श्रीमंत शाहू क्रीडा संकुल सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सातारा जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या तर्फे मंगळवार ३ आणि ४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते
या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्यातील एकूण ११ तालुक्यातील संघांचा समावेश होता यामध्ये साखळी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी च्या जोरावर फलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम (एस एस सी)च्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती . अंतिम सामना सातारा संघासोबत झाला या अटी -ताटीच्या या सामन्यात श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम संघ उपविजेता ठरला .
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रीमंत शिवाजीराजे च्या विनायक दळवी , हसिमराज शहा , वैभव राजगे या तीन खेळाडूंची निवड विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
या निवडीबद्दल खेळाडू व त्याना मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक यांचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदे चे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे व्हाईस चेअरमन मा रमणलाल दोषी ,फलटण एज्युकेशन क्रीडा समिती चे अध्यक्ष मा शिवाजीराव घोरपडे , प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम, प्रचार्या संध्या फाळके, पर्यावेक्षक महेश निंबाळकर, शिक्षक वृंद व इतर मान्यवर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.