संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्यापंढरपूर ते घुमाण रथ व सायकल यात्रेचे उत्साहात सांगतामहाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील १०० सायकल यात्रींचा सहभाग

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण प्रतिनिधी) :-

शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,५०० किलोमीटरच्या काढण्यात आलेल्या रथ व सायकल यात्रेची मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात सांगता झाली . या सायकल यात्रेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे १०० सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला होता .

संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला तर संत तुकाराम महाराज या धर्माचे कळस झाले . संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांनी उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला व भागवत धर्माची पताका फडकावली. पंजाबमधील शीख धर्मीयांमध्ये आपल्या सात्त्विक विचारांचा प्रभाव तेवत ठेवला. मुगल सम्राट फिरोजशा तुघलक यांनी श्री क्षेत्र घुमाण येथे संत नामदेव महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभारले . या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक क्षेत्रातील विश्वातील पहिल्या रथ व सायकल यात्रेला
श्री विठ्ठल भक्तीचा तसेच शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ , नामदेव समाजोन्नती परिषद व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण अशी भव्य रथ व सायकल यात्रा २०२२ पासून सुरु करण्यात आली . यात्रेचे हे तिसरे वर्ष होते .

५० वारकरी तर १०० सायकल यात्रींचा सहभाग

. संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील सायकलस्वारांनी भरभरून प्रतिसाद दिला होता . विविध राज्यांतील भाविकांची मागणी आणि संत नामदेव महाराजांच्या शांती, समता व बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी यंदाही भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद , श्री नामदेव दरबार कमिटी घुमाण ( पंजाब ) व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संस्था-संघटनांच्या वतीने ही यात्रा १२ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) कडे प्रस्थान केले होते . या यात्रेत सुमारे ५० वारकरी व १०० सायकलयात्री सहभागी झाले होते , ही यात्रा महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , हरियाणा मार्गे पंजाब राज्यातील संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरुदासपूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घुमाण येथे ४ डिसेंबर रोजी पोहोचली.

नामदेव समाजाकडून देशभरात उत्साही स्वागत
संत नामदेव महाराजांच्या रथ व सायकल यात्रेचे महाराष्ट्रासह गुजरात , राजस्थान , हरियाणा , पंजाब राज्यात मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करणार आले. भाविकांनी पादुकांची पूजा व सायकल यात्रींचा सन्मान करीत यात्रेस शुभेच्छा दिल्या. श्री क्षेत्र घुमाण येथे ५ डिसेंबर रोजी सायकल यात्रेचा समारोप झाला . त्यानंतर ही रथयात्रा पंजाब , हरियाणा , दिल्ली , उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश राज्यातुन प्रवास करीत दि . १२ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचली.
पंढरपूरच्या नामदेव मंदिरात विधीपुर्वक सांगता
संत नामदेव महाराजांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे संत नामदेव परिवाराकडून मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात यात्रेचे स्वागत करण्यात आले . संत नामदेवांचे वंशज ह भ प निवृत्ती महाराज नामदास , मुकुंद महाराज नामदास , एकनाथ महाराज नामदास , माधव महाराज नामदास , ज्ञानेश्वर महाराज नामदास , केशव महाराज नामदास , कृष्णदास महाराज नामदास आदी यावेळी उपस्थित होते .
पाटण जि सातारा येथील माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपकसिंह पाटणकर , यशश्रीदेवी पाटणकर यांच्या हस्ते संत नामदेवांच्या पादुकांची विधीवत पूजा करुन आरती व महाप्रसादानंतर नामदास परिवाराचा व सोहळ्यात सहभागी वारक-यांचा शाल , श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला . महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली .
या सोहळ्याचे नियोजन नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवसकर , सचिव डॉ अजय फुटाणे , उपाध्यक्ष रविंद्र रहाने , विश्वस्थ वसंतराव खुर्द , पंकज सुत्रावे , सीमा नेवासकर , वैष्णवी नेवासकर , भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उपाध्यक्ष शंकर टेमघरे , सचिव ॲड विलास काटे , खजिनदार मनोज मांढरे , सदस्य सुभाष भांबुरे , राजेंद्र मारणे , राजेंद्रकृष्ण कापसे , राज्य समन्वयक खेमराज नामा ( राजस्थान ) , मुलचंदजी परमार ( गुजरात ) , सिताराम टांक ( राजस्थान ) , सरबजितसिंह बावा ( पंजाब ) , प्रेमसिंह अग्रोईया ( हरियाणा ) , महेंद्र लड्डा ( दिल्ली ) , किशनसिंह राजपूत ( उत्तर प्रदेश ) , अशिष नामदेव ( मध्यप्रदेश ) आदीनी केले होते .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!