यशस्वी विद्यार्थीनी यांचा सन्मान करताना मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-
श्री सद्गुरु शांतीदास महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी व श्री दत्तजयंतीनिमित्त आयोजित भव्य खुलागट भजन स्पर्धा गुरुवार, दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कटफळ (ता. बारामती, जि. पुणे) या शाळेने प्रथम क्रमांक पटकावून पटकाविला
शाळेला ११,००० रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सुहास आटोळे सर आणि गुलाब आटोळे यांचे कुशल मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भजनांनी प्रेक्षक व परीक्षकांना मंत्रमुग्ध केले.
सहभागी विद्यार्थिनीं
शिवांजली आटोळे,आकांक्षा बागुल,अनुष्का गायकवाड, प्रियंका आटोळे, कीर्ती निलटे, दिव्या कांबळे
, भावना माळी,अंजली बागुल,मानवी जगताप या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चे अध्यक्ष संग्राम मोकाशी व इतर पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले