शेतकऱ्यांची मुले जेवलर्स क्षेत्रात उत्कृष्ट व्यवसाय करतील : अजित पवार

अष्टविनायक ज्वेलर्स च्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार किशोर फडतरे व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-


ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुले सोने चांदी च्या क्षेत्रामध्ये येऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील उत्तम व उत्कृष्ट व्यवसाय करतील अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुई येथील अष्टविनायक ज्वेलर्सच्या उद्घाटन प्रसंगी केली.
या प्रसंगी माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशव जगताप, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे,
बारामती बँक अध्यक्ष सचिन सातव,पीडिसी बँक संचालक संभाजी होळकर, दूध संघ चेअरमन पोपटराव गावडे,कृषी आयुक्त प्रशांत गवळी व रुई चे मा. नगरसेवक विष्णू चौधर,मा.सरपंच मच्छिंद्र चौधर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तीत होते.
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर किशोर फडतरे व कुटूंबियांनी शेती व इतर क्षेत्रात केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अष्टविनायक ज्वेलर्स च्या माध्यमातून रुई बारामती व औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना सहज उपलब्ध होणारे सर्व सोन्या चांदीचे दागिने योग्य भावात गुणवत्ता व दर्जात्मक देण्यासाठी बांधील असल्याचे बारामती तालुका दूध संघाचे संचालक किशोर फडतरे यांनी सांगितले.
उपस्थितांचे स्वागत हर्षद फडतरे महादेव लांडगे यांनी केले.सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी व आभार प्रदर्शन रमेश देवकाते यांनी केले.



Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!