जान्हवी वीरकर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-
बारामतीच्या इतिहासात प्रथमच सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मधील कु.जान्हवी विरकर हिची “महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन” च्या अंडर-१९ महिला एकदिवसीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या बळावर संघात निवड झाल्याने व ग्रामीण भागातील पहिलीच महिला खेळाडू असल्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचीआदर्श जान्हवी वीरकर झाली आहे.
१९ वर्ष आतील महाराष्ट्र संघातील सहभागी खेळाडू आचल अपवाल(कर्णधार),
भूमिका बव्हाण,श्रद्धा गिरमे(उपकर्णधार)गायत्री सुरवसे,सुहानी खंडाळ,ज्ञानेकुरी पाटील,सह्याद्री कदम,श्रुती महाबळेश्वरकर,मपुरी थोरात (विकेट किपर) , शाल्मली क्षत्रिय,साक्षी शिंदे,निकिता सिंग,आमनी नंदल, जान्हवी विरकर,श्रेया पाटील, वैष्णवी माशाळकर या सर्व खेळाडूचे मनःपूर्वक अभिनंदन करून व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर मानसिंग आटोळे यांनी दिल्या व उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय संघात सुद्धा स्थान पटकवेल व देशासाठी सर्वोत्तम खेळ करेल अशी अपेक्षा व्यक्त केली