प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते सन्मान होताना
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-
दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या “राष्ट्रीय ग्राहक दिन” निमित्त आयोजित संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत “कु.सुरज सुधीर सुर्यवंशी (इयत्ता: ६वी, विद्या प्रतिष्ठान डॉ. सायरस पुनवाला स्कुल बारामती)” यास “राष्ट्रीय ग्राहक दिन” या विषयावर दिलेल्या भाषणास “प्रथम” पारितोषिक मिळाले. प्रशासकीय भवन बारामती येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते त्याला संस्कृत या अतिशय प्राचीन तसेच क्लिष्ट भाषेत उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून “सन्मान चिन्ह” व “प्रमाणपत्र” देऊन विशेष गौरव करण्यात आला. या समारंभाला उपमुख्यमंत्री कार्यालयाचे एस ओ डी हनुमंत पाटील,तहसीलदार गणेश शिंदे , मुखध्यधिकारी महेश रोकडे, तुषार झेंडे, प्रमोद जाधव, डॉ. अनिल बागल, पी. बी. एरंडे ,सौ. तितिक्षा बारापत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कु. सुरज यास विद्या प्रतिष्ठान संस्थेचे संस्कृत विभागाचे शिक्षक कृष्णशास्त्री धुमाळ यांचे याकामी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.