लहान मुलांना खांद्यावर गडाच्या खाली घेऊन जाताना बारामतीच्या पैलवान ग्रुपचे सदस्य
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-
बारामती येथील पैलवान ग्रुपने हरिश्चंद्र गडावर मधमाशांच्या झालेल्या हल्ल्यात पर्यटक असलेल्या लहान मुलांना वाचवून जीवदान दिले आहे.
बारामती मधील युवकाचा ग्रुप या मध्ये सर्वाधिक पैलवान मंडळी आहेत म्हणून म्हणून त्यास पैलवान ग्रुप असं म्हटलं जातं.
रविवार १५ डिसेंबर रोजी ट्रेकिंग साठी अहिल्यानगर जिल्ह्यातील गोठाले गाव या ठिकाणी सदर ग्रुप गेला होता.
रविवार सुट्टी चा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती व काही शालेय मुलाच्या सहली सुद्धा आल्या होत्या
दुपारी २ च्या सुमारास सुमारास अचानकपणे आगी मोहोळच्या मधमाशांनी तेथील पर्यटकांवर हल्ला सुरू केला व चावे घेण्यास सुरुवात केली त्यामुळे एकच खळबळ उडाली व वाट मिळेल तिकडे पर्यटक पळू लागले यामध्ये काही लहान मुलांना सदर मधमाशा चावू लागल्या व गर्दी मुळे लहान मुले सुद्धा जोरजोरात रडू लागले ज्यांना माशा चावल्या ते मुले काही ठिकाणी बेशुद्ध पडली परिस्थितीचं गांभीर्य पाहून त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पैलवान ग्रुपने लहान मुलांना उचलून खांद्यावर टाकून पुढील उपचारासाठी गडाच्या खाली त्वरित आणले आणि प्राथमिक उपचार देण्यासाठी स्थानिक डॉक्टरांकडे नेले त्यामुळे त्यांच्यावर त्वरित उपचार करून त्यांना बरे करण्यात यश आले.
कदाचित उशीर झाला असतात तर अनर्थ घडला असता.
लहान मुलांना उचलून आणण्यासाठी
पैलवान ग्रुप बारामती चे
पै. आकाश भाऊ शेरेपाटील ,
शुभम पिसाळ,अभीजित आटोळे,
ऋषिकेश माने,ईश्वर भोसले,
सागर मुंडे,गौरव येवले,
निनाद पाटील,निलेश मुळे
गणेश तावरे,विश्वजीत भोसले
प्रशांत भरणे आदींनी जीवाची बाजी लावून मुलांना खांद्यावर घेऊन जोरात पळत जाऊन गडाच्या खाली आणले.
त्यामुळे शिक्षक, पालक व इतर पर्यटक यांनी आभार मानले.
अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे सर्वच पर्यटक सैरभैर झाले होते परंतु लहान मुलांकडे कोण लक्ष देत नव्हते प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होते,आसरा शोधत होते , पिसाळलेल्या माशांच्या चावामुळे मुले बेशुद्ध झाली होती परंतु वेळेत उपचार मिळाल्याने सर्वजण सुखरूप घरी पोहवू शकले ही परमेश्वराची कृपा आहे पैलवान ग्रुप फक्त माध्यम असल्याची प्रतिक्रिया आकाश शेरे पाटील यांनी दिली.