गोविंद मिल्क च्या वतीने फलटण येथे 31 डिसेंबर रोजी स्तुत्य उपक्रम.

फलटण टुडे वृत्तसेवा :-

31 डिसेंबर मंगळवार रोजी फलटण येथे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., निकोप हॉस्पिटल, फलटण डॉक्टर असोसिएशन, फलटण नगरपरिषद आणि फलटण शहर पोलीस स्टेशन
यांच्या संयुक्त विद्यमानाने 31 डिसेंबरच्या रात्री शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गोविंद दूध वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सुंदर फलटण., निरोगी फलटण, सुरक्षित फलटण ही घोषवाक्य घेऊन 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या सामाजिक उपक्रमातून करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळात चार ठिकाणी गोविंद मिल्क च्या वतीने दुधाचे वाटप करून आरोग्यासाठी दुधाचा आहार किती आवश्यक आणि उत्तम आहे याचे महत्त्व पटवून तरुण पिढीला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला यावेळी देण्यात येणार आहे.
फलटण शहरात खालील ठिकाणी दुधाचे वाटप करण्यात येणार आहे
1) नाना पाटील चौक (सायं. ५.०० ते ५.१५)
2) आंबेडकर चौक (सायं. ५.१५ ते ५.३०)
3) डी. एड, चौक (सायं. ५.३० ते ५.४५)
4) महात्मा फुले चौक (सायं. ५.४५ ते ६.००)
या ठिकाणी फलटण शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि फलटण शहरातील तरुण पिढीला आपल्या आरोग्यासाठी काय आवश्यक आहे आणि व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर काय होतात याबाबत निकोप हॉस्पिटलचे डॉक्टर जे टी पोळ युवकांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच 31 डिसेंबरच्या रात्रीच्या वेळी फलटण शहरातील नागरिकांना शांतता भंग होऊन कोणताही त्रास होऊ नये, काही अपघात होऊ नये, आणि कायदा व सुव्यवस्था शहरात उत्तम राहावी यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधिकारी श्री यशवंत नलावडे हे मार्गदर्शन करून व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला युवकांना देणार आहेत. हा सामाजिक उपक्रम फलटण शहरामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखावी आणि कोणत्याही प्रकारचे दंगा गडबड गोंधळ न करता सर्व नागरिकांना येणाऱ्या नवीन वर्षाचा आनंद घेता यावा यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. असेही प्रतिपादन श्री यशवंत नलावडे पोलीस अधिकारी फलटण शहर पोलीस स्टेशन यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!