फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-
विद्या प्रतिष्ठानचे इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (VIIT) बारामती महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी महाविद्यालयातर्फे वर्षभर विविध ट्रेनिंग प्रोग्रॅम्सचे आयोजन केले जाते.
अलीकडेच महाविद्यालयातील एम.बी.ए. विद्यार्थ्यांची ऑन कॅम्पस ड्राईव्हद्वारे नोकरीसाठी निवड झाली आहे.
नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे – वैष्णवी बनसोडे, मधुरा धोत्रे, ऋतुजा कांबळे, हृषीकेष सूर्यवंशी, ओंकार डेरे आणि अमीषा कुंभार यांची एच.डी.एफ.सी. लाइफ ,पुणे येथे एक्झिक्युटिव ट्रेनी या पदासाठी निवड झाली आहे तसेच त्यांना कंपनीतर्फे ४.७५ लाख रुपये वार्षिक पगाराचे पॅकेज देण्यात येणार आहे.
या कामी विद्या प्रतिष्ठानचे ट्रेनिंग अंड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.विशाल कोरे आणि व्ही.आय.आय.टी.चे संचालक डॉ. आनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे समन्वयक कु. निलोफर खान यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची आणि मॅनेजमेंट कॉऊन्सिलचे सर्व सदस्य, रजिस्ट्रार श्रीश कंबोज, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.