श्रीमंत शिवाजी राजे क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय फुटसॉल स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) : –

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सातारा , फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती ,फलटण जिमखाना फलटण तसेच फुटसाल असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण येथे उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटी च्या गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य व फलटण एज्युकेशन सोसायटी च्या क्रीडा समितीचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव घोरपडे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री सुधीर अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री माने सर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सदस्य श्री महादेव माने, सीनियर फुटबॉल खेळाडू श्री संजय फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ सर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये सुरुवातीला फुटसाल फुटबॉल याविषयी माहिती सांगितली तसेच श्रीमंत शिवाजी राजे क्रीडा संकुला विषयी देखील माहिती सांगितली. महाराष्ट्र खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार राष्ट्रीय खो,-खो स्पर्धेचे आयोजन या क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले. व या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकांना देखील माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांनी पारितोषिक दिलेली आहेत याचा विशेष उल्लेख केला.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री सुधीर अहिवळे साहेबांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व या स्पर्धेचे उद्घाटक माननीय श्री शिवाजीराव घोरपडे साहेबांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेमध्ये खिलाडू वृत्तीने सहभाग घ्यावा व खेळाचा आनंद घ्यावा असे मार्गदर्शन केले.
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी फुटबॉल प्रशिक्षक श्री अमित काळे सर, श्री अमोल नाळे सर, श्री सुहास कदम सर तसेच सर्व सीनियर फुटबॉल खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.
या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन मुधोजी महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर श्री तायाप्पा शेडगे सर यांनी केले.
या आंतर शालेय फुटसाल स्पर्धेत श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या १७ वर्षांखालील मुली आणि मुले अशा दोन्ही गटांनी प्रथम क्रमांक पटकावला.
17 वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम सीबीएसई

स्कूल विरुद्ध मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण संघात झाला. त्यात श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल संघाने २-० अशी क्लीन स्वीप करीत सामना आपल्या नावे केला.
17 वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम सीबीएसई

स्कूल विरुद्ध श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज एस एस सी. त्यात संघाने २-० अशी क्लीन स्वीप करीत सामना आपल्या नावे केला.
19 वर्षाखालील मुलांच्या संघांमध्ये मुधोजी हायस्कूल फलटण संघाने विजय प्राप्त केला
19 वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण
विरुद्ध श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम सीबीएसई संघात झाला. त्यात संघाने 5 -0अशी क्लीन स्वीप करीत सामना आपल्या नावे केला.

19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएससी च्या मुलींनी बाजी मारली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!