श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण शेती व शेतकरीभिमुख उपक्रम राबवण्यात अग्रेसर – कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ०३):-

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चे उदघाटन समारंभाला मा. डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराज साहेब, माजी सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली समारंभाचे प्रास्ताविक मा. ना. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सातारा तथा सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी शेती शाळेची स्थापना व पार्श्वभूमी तसेच दोन्ही महाविद्यालयाची स्थापना हे श्रीमंत शिवाजीराजांचे स्वप्न, महाविद्यालयाचे शेतकऱ्यांसाठी महत्व, कृषी प्रदर्शनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व कृषी, कमीत कमी खर्चातून अधिकतम उत्पादन अशा विविध विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यानंतर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी.चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्याची ओळख करून देताना त्यांच्या कामकाजचा आढावा सविस्तर विषद करून दिला. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराज साहेब, यांचा अल्प परिचय व सामाजिक राजकीय कामकाजाचा आढावा सविस्तर विषद केला. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, सन्मानचिन्ह व मानाची चांदीची तलवार देऊन मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराज साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रथमता ऊस उत्पादक श्री. चंद्रकांत बेलदार, मौजे सरडे, द्राक्ष उत्पादक हिंदुराव सूळ, मौजे खडकी,भाजीपाला उत्पादक श्री. बाबुराव गायकवाड, मौजे फडतरवाडी, दूध उत्पादक सौ. स्वाती पवार मौजे मुंजवडी, डाळिंब उत्पादक श्री. चंद्रकांत आहिरेकर, मौजे वाठार निंबाळकर या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान केला. श्री. नितीन गांधी व स्पोर्ट्स क्लब, कराड यांनी टी शर्ट प्रायोजक केल्यामुळे विशेष सन्मान करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिनाचे अभिवादन केले, महाविद्यालयाचे फलटण व पंचक्रोशीतील शेतकरीभिमुख कर्तव्य, कृषि प्रदर्शनामध्ये शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा, शेतीचे यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण तसेच प्रिसिजन एग्रीकल्चर, महाराष्ट्रातील 34 ते 50 टक्के क्षेत्र कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाने व्यापले आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे देशातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ म्हणून गणले जात आहे, मार्गदर्शन करताना कुलगुरू यांनी डिजिटल एग्रीकल्चर, गट शेती आधारित उपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित शेतकरी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर अध्यक्षीय भाषण करताना मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराज साहेब यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे लाभलेले कुलगुरूंची कारकिर्द, कृषी विद्यापीठातील अडचणी, हवामान आधारित शेती साठी बदललेले ऋतुचक्र, तापमान वाढीचे बदल व शेतीवर होणारे परिणाम, जागतिक तापमान वाढीचे परिणाम आधारित अभ्यास केंद्र स्थापन करण्यात यावे, आधुनिक शेती तंत्रज्ञान आधारित शेतीकडे लक्ष द्यावे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदरील समारंभासाठी श्री. भोजराज नाईक निंबाळकर, चेअरमन, इंटरनॅशनल लाइन्स क्लब, श्री. शरदराव रणवरे व्हाईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती, श्री. धनंजय पवार, अध्यक्ष, फलटण सहकारी दुग्ध संघटना, श्री. बाळासाहेब शेंडे, चेअरमन कारखाना फलटण, श्री. रणजीत निंबाळकर, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, श्री. रमनशेठ दोशी, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, श्री. आर. एच. पवार, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, श्री. शिरीष दोशी, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, श्री. शिरीष भोसले, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, श्री. सी. डी. पाटील, सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, श्री. अरविंद निकम, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, श्री. दत्तात्रेय अनपट, सदस्य, जिल्हा परिषद, सातारा, श्री. मोमीन खलील, उपविभागीय कृषी अधिकारी, फलटण, श्री. आर. एस. जाधव, मंडळ कृषी अधिकारी, फलटण, श्री. सतीश निंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी, फलटण, श्री. एम. एस. ननावरे, सहाय्यक अभियंता एम.एस.ई.बी., फलटण तसेच फलटण तालुक्यातील शेतकरी, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. आर. ससाने,कुमारी श्रेया गायकवाड, कुमारी तनिष्का दौंडकर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ए. पी. रणवरे यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!