फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ०३):-
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 आयोजित चर्चासत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे विषय विशेषज्ञ, मृदा शास्त्र व रासायनिक शास्त्राचे डॉ. विवेक भोईटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधुनिक शेतीसाठी वापर हा एक उत्तम पर्याय आहे असे मार्गदर्शन केले. सदरील चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी श्री.आर.एच. पवार, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण हे उपस्थित होते, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेची सविस्तर माहिती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधुनिक शेतीसाठी उपयोग, आधुनिक शेतीसाठी पाण्याची व खताची बचत, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे ऊस पिक घेताना फर्टिगेशन तंत्रज्ञान, नवीन कीटकनाशकांची व खतांची माहिती या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषि विभागाचे कृषि सहायक श्री. कुलदीप नेवसे यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विविध कृषी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना श्री. आर. एच. पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच आयोजित विविध कृषी विषयक चर्चा सत्रांचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले. या चर्चासत्रासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, शेतकरी वर्ग उपस्थित राहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी सृष्टी झाहडावकर या विद्यार्थिनीने केले.