लडकत अकॅडमी च्या वतीने विद्यार्थ्यां साठी शिष्यवृत्ती परीक्षा

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-


लडकत सायन्स अकॅडमी अर्थातच लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन अँड ज्युनिअर कॉलेज बारामती यांनी इयत्ता १० मध्ये शिकत असणाऱ्या मुलांसाठी इयत्ता ११ वी प्रवेशासाठी लडकत स्कॉलरशिप परीक्षा रविवार दि.५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित केली आहे.
त्यामधून विद्यार्थांना २ लाख रुपयांची स्कॉलरशिप जिंकण्याची संधी मिळणार आहेत तसेच प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी भरघोस बक्षिसे ठेवली आहेत .
बक्षिसे:
प्रथम क्रमांक – शैक्षणिक टॅब
द्वितीय क्रमांक – स्मार्ट वॉच प्रो
तृतीय क्रमांक – स्मार्ट वॉच
उत्तेजनार्थ बक्षीस:
पहिल्या १० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग दिली जाईल.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.नाव नोंदणीसाठी:
९५४५९५२५४७ या नंबरवर व्हॉट्सॲप करून विद्यार्थी चे नाव, शाळेचे नाव आणि इयत्ता चा उल्लेख करावा.अधिक माहिती साठी ७७४१०१७२६६ व ९५४५९५२५४७ वर संपर्क साधावा
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनमध्ये ,प्री प्रायमरी ते १२ वी सायन्स पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इयत्ता ५ वी पासूनच विद्यार्थ्यांची मेडिकल आणि इंजिनीअरिंग संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली जाते. यासाठी तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, कॉम्पुटर लॅब, सायन्स लॅबोरेटरी, प्रशस्त मैदान आणि निसर्गरम्य वातावरण उपलब्ध आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थांनी या स्कॉलरशिप परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य रामचंद्र वाघ यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!