सेव्हन स्टार आयकॉन बारामतीच्या वैभवात भर घालणार: अजित पवार

बारामती मधील पहिली सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन संपन्न

सेवन स्टार आयकॉन या इमारतीचे भूमिपूजन करताना अजित पवार व समवेत सर्व संचालक

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-


गुणवत्ता व दर्जा देत या इमारत मधील रहिवाशी यांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा मिळणार असल्याने बारामती शहरातील सर्वात उंच इमारत असलेला प्रोजेक्ट सेव्हन स्टार आयकॉन बारामतीच्या बांधकामाच्या वैभवात भर घालणार आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
रविवार दि.५ जानेवारी रोजी विद्या प्रतिष्ठान नजीक असलेल्या समर्थ आयकॉन चा सेव्हन स्टार आयकॉन या रहिवासी व व्यापारी संकुल असलेल्या प्रोजेक्ट चा थ्रीडी मॉडेल अनावरण व भूमिपूजन प्रसंगी अजित पवार बोलत होते.
या प्रसंगी मा. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख ,पियाजो कंपनीचे चेअरमन डीएगो ग्राफी व सेव्हन स्टार आयकॉन चे संचालक भारत मोकाशी, ॲड.हरीश कुंभरकर,मेजर अनिल कायगुडे , दादासाहेब चौधर, गणेश मोरे, संतोष दिवेकर, उदयसिंह मोरे पाटील आदी मान्यवर, ग्राहक व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

बारामती चा वाढता विकास होत असताना मेडिकल हब, एज्युकेशन हब, म्हणून बारामती ची नवीन ओळख होत आहे , देशातील व जगातील अनेक नामांकित ब्रँड बारामती मध्ये येत आहेत त्यामुळे अनेकांना राहण्यासाठी जागा व व्यवसायासाठी शॉप्स, कार्यालय ची आवश्यकता आहे गुणवत्ता व दर्जा ,वेळेत व शासकीय नियमांचे पालन करत उत्कृष्ट बांधकाम केले तर ग्राहक नवीन प्रोजेक्ट साठी शोधत येतील बारामती मधील पहिली सर्वात उंच इमारत(१६ मजली) असल्याने कौतुक असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

संतुष्ट व समाधानी ग्राहक हीच आमची खरी ओळख आहे , यापुर्वी तालुक्यातील सर्वात स्वस्त घरे देण्याचा मान “समर्थ आयकॅान “ कडे आहे . अति उच्च गुणवता , दर्जात्मक बांधकाम देताना ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर व व्यवसायिक बांधकाम देण्यासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध असल्याचे प्रास्ताविक मध्ये समर्थ आयकॉन चे संचालक ऍड हरीश कुंभारकर यांनी सांगितले .

आत्याधुनिक व तंत्रज्ञान च्या युगात बारामती म्हणजे पर्यावरण,स्वछता व नाविन्यपूर्ण चा ध्यास घेणारा तालूका असून सदर इमारत मधील सेवा सुविधा व थ्रीडी मॉडेल पाहिल्यावर इटली मध्ये असल्याचा भास होत असल्याचे पियाजो कंपनीचे चेअरमन डीएगो ग्राफी यांनी सांगितले.

सदर इमारत चे थ्रीडी मॉडेल सादरीकरण मेजर अनिल कायगुडे यांनी केले तर उपस्तितांचे स्वागत सर्व संचालक यांनी केले.सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक दादासाहेब चौधर यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!