फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०६):-
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 आयोजित चर्चासत्रामधे खर्च कमी करून उत्पन्नाचा स्रोत वाढवणे या धरतीवर आधारित पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धव्यवस्थापन या विषयावर बोलताना शेतकऱ्यांनी एकात्मिक पशुधन व्यवस्थापनाचा वापर कसा करावा तसेच मुक्त संचार गोठा पद्धत,जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे करावे,आजार कमी करण्यासाठी मुक्त संचार गोठ्याचा वापर केल्यास पशुधन व्यवस्थापनामध्ये जास्त फायदेशीर ठरते. जनावरांचे आरोग्य नियंत्रण तसेच गोविंद दूध डेअरी मार्फत पशुधन वाढवण्यासाठी विविध योजनाचा वापर करून महिला सक्षमीकरण,मुरघास निर्मिती प्रकल्प,चारा प्रकल्प , शेणखताचा वापर तसेच शेणखत निर्मिती प्रकल्प ,याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना पशुधन व दुग्ध व्यवसाया विषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले.
तसेच व्यवसायामध्ये विविध मुल्यावर्धित पदार्थांची निर्मिती व विक्री करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा याचीही माहिती उपस्थिताना दिली चर्चासात्रातील दुसऱ्या भागामध्ये सौ. सुनीता सावंत मॅडम कृषी विभाग फलटण यांनी फूड प्रोसेसिंग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले यामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रक्रियायुक्त पदार्थ्यांचे प्रशिक्षण, महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान तसेच योजने अंतर्गत मिळणाऱ्या पायाभूत सुविधा,सूक्ष्म अन्नप्रक्रिया व्यवसायामध्ये तयार होणाऱ्या पदार्थाची विक्री, सामूहिक गटशेती या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सदरील चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी मा श्री. शरदराव रणवरे व्हा चेअरमन मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण मा. श्री आर. एच. पवार सदस्य मे गव्हर्निंग कौन्सिल फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण हे उपस्थित राहून यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर,कृषी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. यू. डी.चव्हाण,दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग,विद्यार्थी,शेतकरी वर्ग उपस्थित राहिले सरतेशेवटी मा. श्री गोविंद नामदेव शेळके नारळ पीक उत्पादक गाव पाडेगाव,, मा.श्री सचिन विलास गावडे , ढोबळी मिरची उत्पादक गाव कुरवली बुद्रुक, मा. श्री महेश देवराव धुमाळ डाळिंब उत्पादक धुमाळवाडी, मा. श्री समीर परमेश्वर बोंद्रे केळी उत्पादक मुरूम या प्रगतशील शेतकऱ्यांचा प्रशास्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रुष्टी झाडोकर या विद्यार्थिनीने केले . मा प्राचार्य डॉ एस. डी. निंबाळकर सर यांनी श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चे आदरणीय मान्यवर मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब अध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तथा माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, मा. श्री डॉ पी. जी. पाटील कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा )सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तथा मा. अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा. मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण तथा चेअरमन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, मा श्री अरविंद निकम प्रशासन अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण आदी मान्यवर, सन्मान प्राप्त शेतकरी बंधू,,सर्व शेतकरी बंधू दोन्ही महाविद्यालयाचा स्टाफ, प्रदर्शन आयोजन कमिटी यांचे विशेष आभार मानून श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चा समारोप केला..शब्दसंकलन व शब्दांकन – प्रा. एन. एस. धालपे , डॉ. जी. बी. अडसूळ यांनी केले.