फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ६):-
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 आयोजित चर्चासत्रामध्ये कृषी महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी उद्योजकता विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशील शेतीमध्ये जे विविध व्यवसाय करू शकतो यामध्ये मधमाशी पालन, रेशीमउद्योग,पपई पासून तुटिफुटी,शेळीपान,मेंढीपालन, वारहपालन, मस्त्याव्यावसाय, कुकूटपालन, गांडूळखत निर्मिती तसेच महिलांसाठी शेवई तयार करणे, उडीद, नाचणी,ज्वारी, बाजरी,मका इत्यादी विविध धान्यापासून पापड उद्योग, लोणाच व्यवसाय, जाम,जेली, तांदळापासून पोहे,चुरमुरे,खोबरे,तीळ शेंगदाणा चिक्की,मेणबत्ती व्यवसाय भातशेतीसाठी उपयुक्त शेवाळे निर्मिती, फुलशेती, नर्सरी स्टायलो ग्रास निर्मिती इत्यादी लाभदायी असे मार्गदर्शन केले.
तसेच व्यवसायामध्ये विविध मुल्यावर्धित पदार्थांची निर्मिती व विक्री करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा याचीही माहिती उपस्थिताना दिली चर्चासात्रातील दुसऱ्या भागामध्ये वक्ते सचिन जाधव कृषी सहाय्यक खुंटे यांनी फळांचे गाव धुमाळवाडी या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या विषयावर बोलताना हुमणी अळी मुक्त लष्करी अळी मुक्त गाव तयार केल्याबद्दल राज्यशासन पुरस्कार प्राप्त करण्याचा सन्मान मिळाला तसेच फळांचे गाव उभारताना कोणती फाळपीके घेतली याचेही मार्गदर्शन केले.सदरील चर्चासत्रासाठी अध्यक्षस्थानी मा श्री. शिरीषकुमार दोशी , सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण हे उपस्थित होते श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी, शेतकरी वर्ग उपस्थित राहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी श्रुष्टी झाडोकर या विद्यार्थिनीने केले.
शब्द संकलन ्व शब्दांकन – प्रा. एन. एस. धालपे , डॉ. जी. बी. अडसूळ