” नितीन नाळे यांना राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार जाहीर”


फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.१०):-

कवी व्याख्याते लेखक गायक    विद्यार्थीप्रिय आदर्शशिक्षक श्री प्रा नितीन नाळे वाठार निंबाळकर तालुका फलटण जिल्हा सातारा यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक साहित्यिक पर्यावरणीय प्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन 2025 चा राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे*
   *राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती चे संयुक्त विद्यमाने समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग विसावा सोशल फाउंडेशन पुणे हिरकणी महिला विकास संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्येचे माहेरघर पुणे येथे सदर सत्कार सोहळा आयोजित केला आहे
    
सदर पुरस्कार सोहळा कला शिक्षण साहित्य समाज युवक पर्यावरण संस्कृतीक महिला अशा विविध अंगी क्षेत्रात असामान्य वाटचाल करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा विलोभनीय सत्कार सोहळा आयोजित केला आहे हा सोहळा दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी पत्रकार भवन गंजवे चौक नवी पेठ पुणे येथे दुपारी ठीक दोन वाजता संपन्न होत आहे
  
हा पुरस्कार श्रीमान मुरलीधर मोहोळ (अण्णा) केंद्रीय मंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री भारत सरकारमेघराज राजे भोसले अभिनेते (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ महाराष्ट्र ) तृप्ती देसाई (अध्यक्ष भूमाता ब्रिगेड ) ध्रुव दातार अभिनेता (लक्ष्मीची पावले मालिका फेम )आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा प्रदान होणार आहे प्राध्यापक नितीन नाळे यांनी सातत्यपूर्ण गेल्या 24 वर्षांत विविध विषयांवर जवळजवळ  1467 प्रबोधनात्मक व्याख्याने समस्त महाराष्ट्रभर सादर केली आहेत शिवाय पर्यावरणीय फटका हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे तसेच शिक्षण कला पर्यावरण साहित्य काव्य परिसंवाद संस्कृती क्रीडा अधिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनी कार्याची दखल घेऊन यंदाचा राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा व अभिनंदन याचा वर्षाव होत आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!