विद्या प्रतिष्ठानच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार प्रदान

उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार स्वीकारताना डॉ सुमन

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि .११):-


येथील विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास ऍग्रो केअर कृषी मंच संस्थेने या वर्षीचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन गौरविले आहे महाराष्ट्रातील कृषी संशोधक, कृषी विस्तारक, कृषी उद्योजक, शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी, उत्कृष्ट महाविद्यालय यांना ऍग्रो केअर कृषी मंच संस्थेद्वारे दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
धाराशिव येथे दि.७रोजी झालेल्या कार्यक्रमात सदर पुरस्कार देण्यात आला राष्ट्रीय पुरस्काराचे हे १६ वे वर्ष होते. महाविद्यालयास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून अ दर्जा प्राप्त झाला आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात बँकिंग, उद्योजकता, शासकीय, संशोधन नाविन्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. सुमन देवरूमठ यांना महा अग्रो आयडॉल अवॉर्ड २०२४ हा पुरस्कार देण्यात आला. ही प्रतिष्ठित मान्यता महाविद्यालयाच्या शिक्षणातील उत्कृष्ट्येसाठीच्या अखंड वचन बध्तेचे प्रतीक आहे. या उल्लेखनीय यश संपादन करण्यात योगदान देणाऱे प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतेचे आणि समर्पणाचे प्रतिबिंब आहे. विद्या प्रतिष्ठानच्या व्यवस्थापनाचे विशेष आभार ज्यांच्या दूरदृष्टी मार्गदर्शन आणि पाठिंब्यामुळे हा टप्पा गाठता आला त्यांच्या प्रोत्सानामुळे हे यश संपादन करण्यात आल्याचे प्राचार्या डॉ सुमन यांनी सांगितले.

या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष अँड.अशोक प्रभुणे खजिनदार श्री युगेंद्र पवार, सचिव अँड. नीलिमा गुजर विश्वस्त सौ.सुनेत्रा पवार डॉ. राजीव शहा श्री. मंदार शेकची श्री किरण गुजर रजिस्ट्रार कर्नल श्रीष कंबोज यांनी महाविद्यालयाने मिळवलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!