माजी सैनिकांच्या हस्ते उद्घाटन प्रसंगी हनुमंतराव निंबाळकर व इतर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ११):-
माजी सैनिकांच्या कार्याची दखल व त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्यांचा मान ठेवून त्यांचे हस्ते उद्घाटन होत आहे ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव निंबाळकर यांनी केले
आरव एन्टरप्रायजेस या फर्निचर शॉप चे उद्घाटन जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष हनुमंत निंबाळकर आणि त्यांचे सहकारी यांच्या हस्ते
करण्यात आले.
राहुल कचरे यांनी स्वागत केले.
मा. सैनिक महादेव मलगुंडे,अण्णा जमदाडे, रवींद्र लडकत, दिलीप चौधरी, शिवलिंग माळी, बलवंत वाघमारे,भिसे साहेब तसेच ढवाण पाटील डॉ.संतोष शिंदे, श्रीरंग जमदाडे,सिकंदर शेख,निखिल होले,अजित मोहोळकर तसेच इतरही सर्व मान्यवर,पाहुणे मंडळी यावेळी उपस्थित होते. आभार राहुल कचरे यांनी मानले सोबतच ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या दर्जाचे मटेरियल देण्याची ग्वाही आणि सैनिक कुटुंबांना स्पेशल डिस्काउंट देण्यात येईल असे आश्वासन राहुल कचरे यांनी दिले.