मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि .१२):-

मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये शनिवार दिनांक ११ जानेवारी हा दिवस स्वराज्य प्रेरिका, राजमाता जिजाऊ व युगाचार्य स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाने साजरी .

या वेळी प्राचार्य, श्री सुधीर अहिवळे , उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , उपमुख्याध्यापक श्री नितीन जगताप यांच्या शुभहस्ते माँ जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सौ वनिता लोणकर यांनी राजमाता जिजाऊसाहेब . यांच्या जीवन चरित्राचा उल्गडा केला. या वेळी सौ.शिंदे मॅडम यांनी स्वामी विवेकानंदाचे विचार व मनोगत व्यक्त केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व विचार व्यक्त केले.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री सुधीर अहिवळे यांनी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन जीवन जगावे असे आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकवृंद सर्वांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार -पडला

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!