इम्पीरियल बँक्केट्स अॅड लॉन्स च्या उदघाटन प्रसंगी मोरे, निंबाळकर व रणसिंग
इम्पीरियल बँक्वेट्स अँड लॉन्स चा उदघाटन समारंभ संपन
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):-
शेतकऱ्यांच्या मुलांनी अशा पद्धतीने व्यवसाय केल्याने समाधान वाटते. त्यांना शाब्बासकी द्यावी, त्यांच्या पाठीवरती थाप टाकावी असे कार्य मुक्ताई लॉन्स व इम्पीरियल बँक्वेट्स अँड लॉन्स च्या माध्यमातून होत असल्याने बारामती च्या वैभवात भर घालण्याचे काम मोरे व निंबाळकर यांनी केले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिपादन केले.
मुक्ताई इव्हेंट्स चे संचालक अनिल निंबाळकर, नितीन मोरे यांनी उभा केलेल्या इम्पीरियल बँक्केट्स अॅड लॉन्स च्या (शनिवार ९ जानेवारी) शुभारंभ प्रसंगी अजित पवार बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक
मंत्री दत्तात्रय भरणे होते.
यावेळी मा. आमदार रामहरी रुपनवर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशव जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे, अविनाश रणसिंग, अॅड. रवींद्र रणसिंग, डॉ. रमेश भोईटे,अॅड आदित्य राणसिंग आदी उपस्तीत होते.
इम्पेरियल बँकेट्स अॅड. लॉन्स ही ही इमारत उभा करण्यासाठी चार एकर जागा अविनाश रणसिंग व अॅड. रवींद्र रणसिंग यांनी भाडे तत्त्वावर दिली आहे. भव्य दिव्य अशा इमारतीमध्ये या परिसरातील लग्न समारंभ व इतर समारंभ होतील. परंतु उद्योग, व्यापार, वाढदिवस त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक चळवळीचे एक केंद्र
बनेल असाही विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
बारामती मेडिकल व एज्युकेशन हब बनत असताना मोठ्या इव्हेंट्स साठी मोठ्या शहरात न जाता आता वातानुकूलित भव्य वेडिंग हॉल ,लॉन्स, डायनींग हॉल,पार्किंग,डेकोरेशन आदी सर्व सुविधा देत असताना सर्व काही एकाच छताखाली देत असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे
‘इव्हेंट्स तुमचा स्वागत आमचे ‘ असे ग्राहकांचे स्वागत करत असल्याचे संचालक नितीन मोरे व अनिल निंबाळकर यांनी सांगितले.
चौकट:
मंडप व डेकोरेशन चा व्यवसाय कोरोना काळात अडचणीत आल्यावर भाड्याच्या जागेत सर्व काही एकाच छताखाली असा एकत्रित इव्हेंट्स घेत असताना ग्राहकांना परवडेल असे विविध पॅकेज दिल्याने बारामती शिवाय इतर तालुके व पुण्यातील सुद्धा ग्राहक येत आहेत कारण गुणवत्ता व दर्जा देणारी इंदापूर तालुक्यातील नितीन मोरे व अनिल निंबाळकर याची उत्कृष्ट सेवा बारामती मध्येकेली असल्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले