आचार्य डिजिटल ऑनलाइन पोर्टल चा शुभारंभ संपन्न
आचार्य अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना बानुगडे पाटील व सोबत ज्ञानेश्वर मुटकुळे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):-
दिखाऊ नाही तर टिकाऊ बना, मोबाईल कामापूरता वापरा, मोबाईल व्यसनी होऊ नका,अभ्यास व मैदानी खेळ यांचा समतोल राखा, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा व स्वतःची स्वप्ने साकार करताना प्रयत्नाची पराकाष्टा करा असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रेरक व्याखायते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.
रविवार दि.०९ जानेवारी रोजी १७२९ आचार्य अकॅडमीच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा व विविध खेळा मधील विद्यार्थ्यांचा सन्मान व
‘गरुडझेप यशाची’ या विषयावर
प्रा नितीन बानुगडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
याप्रसंगी आचार्य अकॅडमी चे संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकुळे,संचालक सुमित सिनगारे,कमलाकर टेकवडे, प्रवीण धवडे, सीओओ निलेश बनकर व प्रतीक पाटील, प्रशांत फरांदे, संजय कापरे, बापू काटकर व संभाजीनगर च्या उपविभागीय पोलीस अधिकारी आरती मुटकुळे , अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कुल चे अध्यक्ष संग्राम मोकाशी आदी मान्यवर व पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
मुले अनुकरण करतात त्यामुळे पालकांनी सुद्धा मोबाईल चा वापर कामापूरता करावा,भविष्याचा विचार करून अभ्यास व मैदान यांचे योग्य नियोजन करा.
आदर्श व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम आचार्य अकॅडमी विविध उपक्रमाच्या माध्यमातून करत आहे कौतुकास्पद असल्याचे प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी सांगितले.
डॉक्टर, इंजिनियर बनण्याचे स्वप्न व संरक्षण क्षेत्रात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्याधुनिक तंत्रज्ञान च्या सुविधा देत असून नीट, जेईई,सीएटी च्या परीक्षेत जास्तीजास्त टॉपर्स अकॅडमी च्या माध्यमातून देशात यावेत व डिजिटल पोर्टल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळणार असल्याचे
आचार्य अकॅडमी चे संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकुळे, यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
आचार्य डिजिटल ऑनलाइन पोर्टल चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी याप्रसंगी स्कॉलरशिप परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व विविध खेळांमधील विजेत्या खेळाडू चा सन्मान प्रा. बानुगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले आभार प्रा. सुमित सिनगारे यांनी केले.