अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन प्रसंगी विद्यार्थी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ):-
आजीतदादा इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्यु. कॉलेज, कटफळ येथील वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी चे अध्यक्ष योगेश बाफणा , डॉ . विनोद पवार, प्रिन्सिपल चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी ,कटफळ, संस्थेचे संस्थापक नानासाहेब मोकाशी , अध्यक्ष संग्रामसिंह मोकाशी, सचिव संगीताताई मोकाशी, सदस्या श्रद्धताई मोकाशी आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वणवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यश मिळवत असताना मैदानी खेळ व अभ्यास यांचा समतोल राखावा व मोबाईल कामापुरता वापरा असा सल्ला योगेश बाफना यांनी दिला.
शाळेच्या प्रगतीचा आढावा अध्यक्ष संग्रामसिंह मोकशी यांनी घेतला.
यश मिळवण्यासाठी प्रत्यनाची पराकाष्ठा करा असे मुख्यध्यापक प्रशात वणवे यांनी सांगितले.
स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, गायन, भाषण व इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
त्रिषा शिंग , शिवांजली आटोळे, श्रेया आटोळे, नूतन गोलांडे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले कल्याणी खोमणे यांनी आभार व्यक्त केले .