फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २२):-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र पुणे आयोजित स्टार उत्सव समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्थळ शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रशिक्षण दिनांक 20 जानेवारी ते 24 जानेवारी 2025 पर्यंत सिंहगड टेक्नॉलॉजी कुसगाव .लोणावळा येथे संपन्न होत आहे
सातारा जिल्ह्यातील सहा इयत्ता सहावी ते बारावी स्तराच्या गटासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सासवड तालुका फलटण येथील ज्येष्ठ प्राध्यापक श्री नितीन महादेव नाळे यांचे राज्यस्तरीय तज्ञ प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे या प्रशिक्षणाचे उद्घाटन अभ्यासक्रम विकसन आराखडा प्रमुख राजेंद्र वाकडे संशोधन विभाग प्रमुख दत्तात्रय थेटे पुणे डायट विभाग प्रमुख प्रभाकर क्षीरसागर वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण जातो वृशाली गायकवाड विजयकुमार गदगडे तेजस्विनी मालवेकर जितेंद्र काठोळे तज्ञ मार्गदर्शक नवनाथ वारकट योगेश देवळालकर बालमनी नंदाला व डाएट कॉलेज साताराच्या अन्नपूर्णा माळी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते