पंचतत्वे आणि नवरस यांची ओळख करून देणारी सादरीकरण कौतुकास्पद :- श्री मिलिंद हळबे

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २४):

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज (SSC), फलटण येथे 17 जानेवारी 2024 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

या वर्षीची स्नेहसंमेलनाची संकल्पना होती ‘संस्कार अपि संस्कृती’ – ज्यामध्ये पंचमहाभूत, नवरस, आणि संस्कारांच्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला. शाळेच्या प्राचार्या सौ. संध्या फाळके यांनी या संकल्पनेची आखणी केली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद हळबे यांचा परिचय व स्वागत करण्यात आले. शाळेचा वार्षिक अहवाल इयत्ता नववीतील रिदा आतार हिने सादर केला. यानंतर शाळेच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, आणि कलात्मक सादरीकरणे केली. यामध्ये प्रथम पंचमहाभूतांवर आधारित नृत्ये सादर झाली. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांची ओळख करून देणारी सादरीकरणे झाली. त्यानंतर नवरस आधारित सादरीकरणे झाली. यामध्ये शृंगार, रौद्र, हास्य, शांत, विभत्स, भयानक, वीर, अद्भुत, आणि करुण रसांचे नृत्य व नाटके सादर करण्यात आली. या कार्यक्रमात काही विशेष सादरीकरणे झाली . त्यामध्ये तानाजी मालुसरे आणि संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा, तसेच शंकर महादेवन यांच्या जीवनावर आधारित नाटक सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ संध्या फाळके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश पवार सर व सौ मनीषा जाधव मॅडम आणि शाळेतील काही विद्यार्थ्यांनी केले केले, तर आभार प्रदर्शन निंबाळकर सर यांनी व्यक्त केले.
पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार मा.श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व संस्कारमूल्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम यशस्वी झाला.
यावेळी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथिंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. मिलिंद हळबे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा.श्री. अशोक जोशी (उपाध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटी), मा.श्री. रमनलाल जोशी(व्हॉइस चेअरमन गव्हर्निंग कौन्सिल स्कूल कमिटी), मा.श्री. भोजराज नाईक निंबाळकर (मेंबर गव्हर्निंग कौन्सिल, मेंबर स्कूल कमिटी), मा.श्री. चंद्रकांत पाटील (मेंबर गव्हर्निंग कौन्सिल, मेंबर स्कूल कमिटी), घोरपडे सर (गव्हर्निंग कौन्सिल मेंबर) मा.श्री. अरविंद निकम (प्रशासकीय अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी)तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधील शाखाप्रमुख सौ.नसरीन जिरायत, सौ वैशाली जाधव, सौ.अनिता राणी कुचेकर, मा.श्री. नरुटे सर तसेच पत्रकार मा.श्री. मुकुटराव कदम तसे च जाधववाडी ग्रामपंचायत सदस्या सौ.सारिका चव्हाण आणि सौ.कल्पना जाधव मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाला पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!