विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्वयंशिस्त महत्त्वाची – तहसीलदार गणेश शिंदे

वंजारवाडी येथील शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणेश शिंदे व व्यासपीठावर उपस्थित

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती: प्रतिनिधी):-
कष्टाला पर्याय नाही तसेच आत्मपरीक्षण, आत्मचिंतन आणि आत्मविश्वास जीवनात महत्त्वाचे आहे आयुष्यामध्ये यशस्वी होत असताना स्वतःचे चारित्र्य कधीही विसरू नका यशाच्या शिखरावर जात असताना वडिलांच्या कष्टाचे आणि आईच्या त्यागाचे भान ठेवून मार्गक्रमण करावे व सर्वांगीण विकासाकरिता स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी प्रतिपादन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन वंजारवाडी येथे दि. २४ जानेवारी ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले .
या प्रसंगी शिबिराचे उद्घाटन बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते याप्रसंगी
विद्या प्रतिष्ठान चे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे ,
वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वणवे, उपसरपंच गोरख चौधर, सदस्य सागर बाळू दराडे, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लवटे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रो. डॉ. लालासाहेब काशीद, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. हणमंतराव पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अमर भोसले, ग्रंथपाल डॉ. अलका घोडके, गणित विभाग प्रमुख प्रा. मेघना देशपांडे, माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. सविता साबळे, प्रा. मंगल गावडे याशिवाय प्रा. तृप्ती कदम, प्रा. सरोजा लांडगे व प्रवीण चौधर, तानाजी चौधर, यशवंत खेडकर, आनंद सावंत, पिंटू सावंत आदी उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. अमित दिव्हारे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ. जगदीश सांगवीकर यांनी करून दिला तर उपस्थितांचे आभार डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कांचन खिरे यांनी केले.
युथ फॉर डिजिटल भारत, युथ फॉर डिजिटल लिटरसी’ ही मध्यवर्ती कल्पना घेऊन शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!