
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २७):-
दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी मुधोजी हायस्कूल
फलटणचे एनसीसी व इतर विद्यार्थी यांच्या समवेत अपघात मुक्त फलटण यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांचे सूचनेनुसार मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली.या रॅली मधे मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे एन सी सी कॅडेट व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता

या रॅलीमध्ये फलटण नगरपालिकेचे अधिकारी श्री तेजस पाटील व महात, पोलीस निरीक्षक गुन्हे यशवंत नलावडे, महिला पोलीस उपनिरीक्षक गाजरे, पोलीस हवालदार किरण जाधव पोलीस अंमलदार परिहार, ट्रॅफिक वॉर्डन, सर्व नेमणूक फलटण शहर पोलीस ठाणे हे सहभागी झालेले होते.

फलटण शहरातील नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळणे, वाहन चालविताना मोबाईल न वापरणे, पादचाऱ्यांना प्राधान्य देणे व अपघात झाल्यास जखमींना मदत करून ताबडतोब पोलिसांना संपर्क करणे याबाबत मार्गदर्शन व आवाहन करण्यात आले.

यशवंत नलावडे
पोलीस निरीक्षक गुन्हे फलटण शहर पोलीस ठाणे सातारा.
