मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

विवध पुरस्कारांचे वितरण व कला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खेळाडूंचा सन्मान

७६ व्या प्रजासत्ताक दिनी प्रशालेत ध्वजवंदना करतान अशोक जीवराज दोशी व इतर मान्यवर

माजी गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने मा. श्रीमती सीमांतिनी कुलकर्णी-खोत यांना सन्मानचिन्ह देवून गौरविताना श्री अशोक जीवराज दोशी व इतर मान्यवर

सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाचे सादरीकरण करताना विद्यार्थी

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.२७) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात आणि रंगारंग कार्यक्रमात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या माजी गुणवंत विद्यार्थीनी फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनाइज़ेशन,UN च्या सल्लागार मा.श्रीमती सीमंतिनी कुलकर्णी-खोत उपस्थित होत्या तसेच डॉ. बी. आर. आंबेडकर इंस्टिट्यूट ऑफ इनफार्मेशन टेक्नोलॉजी चे व्यवस्थापक मा श्री शेखर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन व ध्वजवंदना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री अशोक जीवराज दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष रमणलाल आनंदलाल दोशी, ट्रेझरर हेमंत वसंत रानडे, सदस्य शिरीष शरदकुमार दोशी, सदस्य नितीन शांतीलाल गांधी , सदस्य शिरीष हंबीरराव भोंसले ,सदस्य भोजराज विठ्ठलराव नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बाबूराव घोरपडे, बर्ड ऑफ ट्रस्टीज सदस्य श्रीमती उषादेवी पांडुरंग भोसले , सदस्य डॉ पार्श्वनाथ पुरुषोत्तम राजवैद्य, सदस्य चंद्रकांत दिनकर पाटील, प्रशासन अधिकारी अरविंद सखाराम निकम, तपासणी अधिकारी दिलीप सित्तप्पा राजगुडा तसेच प्रशालेचे प्राचार्य सुधीर अहिवले, माध्यमिक चे उपप्राचार्य नितीन जगताप , ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने , पर्यवक्षिका सौ पूजा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वरील मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य सुधीर अहिवले यांनी केले.

यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत,राज्यगीत, संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले,वरील गीत व वाचन सौ. वनिता लोणकर व प्रशालेच्या विद्यार्थिनी आर्या साळुंखे यांनी सादर केले त्यांना तबला व पेटी वाद्याची साथ अनंत नेरकर व अमोल रणवारे , विद्यार्थी भांबुरे यांनी दिली ,श्री दीपक पवार( डि जे )यांच्या मार्गदर्शनात एन सी सी विभाकडून कंपनी कॉर्टर मास्टर सार्जंट साईराज काटकर व अल्फा ट्रूपचे नेतृत्व छात्र हर्षल जाधव व छात्रा जानवी मरदाने व त्यांच्या कॅडेटकडून मान्यवरांना रिपोर्टिंग व संचलन करून झेंड्यास मानवंदना देण्यात आली.

तसेच यावेळी माजी गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचे सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यामध्ये माजी गुणवंत विद्यार्थीनी फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनाइज़ेशन,UN च्या सल्लागार
मा. श्रीमती सीमंतिनी कुलकर्णी-खोत यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले तसेच ५ वी ६ वी ७ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या व ११ वि १२ वी च्या कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखेमधे प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवविण्या आले. तसेच कला व क्रीडा क्षेत्रात हॉकी ,क्रिकेट,सॉफ्ट टेनिस ,व्हॉलिबॉल, किक बॉक्सिंग,कराटे, शासकीय चित्रकला इंटरमिजेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यस्तरिय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूना सन्मानचिन्ह देऊन गौरवविण्या आले.

तसेच दरवर्षी प्रशालेतर्फे देण्यात येणाऱ्या फलटण एजुकेशन सोसायटी अंतर्गत मानाचा आदर्श शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये ९ शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले यामध्ये श्यामराव बाबा आटपाडकर,राजेंद्र सुरेश रणसिंग ,सचिन जगन्नाथ धुमाळ,संदीप महादेव पवार ,कु तृप्ती विलास शिंदे ,सौ वैशाली शैलेंद्र रसाळ , सौ दीपश्री मिलिंद घाडगे ,सौ शारदा गजानन निंबाळकर, सौ वनिता राजेंद्र लोणकर तर २ शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराचे मानकरी ठरले यामधे लिपिक नितीन वीरसेन भोसले ,सेवक राजेंद्र बबनराव मुळीक अशा ११ जणांना वरील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेल्या विविध हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवर मंडळींकडून करण्यात आले. तसेच सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रतील विविध लोककला, ऐतिहासिक ,देशभक्तीपर गीतांवर प्रशालेतील विद्यार्थांनी आपले कलागुण यावेळी सादर केले. तसेच दरवर्षीप्रमाणे एन सी सी कडून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जिलेबी ,फरसाना व केळी चे वाटप करण्यात आले.

यावेळी पालक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनच्या कला गुणांना प्रोत्साहन व दाद दिली व त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु तृप्ती शिंदे ,संजय गोफणे ,संदीप पवार,भार्गवी बडवे यांनी केले आश्या प्रकारे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!