
विविध कला सादर करत असताना विद्यार्थी
लडकत स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती: प्रतिनिधी):-
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे विभाग प्रमुख डॉ गीतांजली सुडके
यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मा.नगरसेवक सुधीर पानसरे , सोमनाथ भारती, चंद्रशेखर लडकत (सिंचन विभाग, महाराष्ट्र शासन), प्रिया काटकर (शासकीय कामगार अधिकारी) ,सुजित सुपेकर(भारतीय पोस्ट विभाग), दिक्षा गोरे (नगर अभियंता नगर परिषद फलटण) यु. एम. शिंदे (निवृत्त मुख्याध्यापक वसतिगृह विद्यालय कऱ्हाटी व लटकत स्कूल ऑफ फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रा नामदेव लडकत गणेश लडकत प्राचार्य रामचंद्र वाघ आदी मान्यवर उपस्तीत होते.
या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटक आणि कराटे प्रात्यक्षिके सादर केली. मुलांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सोशल मीडिया मोबाईल अती वापरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. भारतीय संविधानाचा सर्वांनी आदर व पालन केले पाहिजे,आजच्या विद्यार्थांमध्ये उद्याचे भविष्य दडलेले आहे असे ही डॉ.गीतांजली सुडके यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची एमबीबीएस साठी नामांकित शासकीय व प्रायव्हेट वैद्यकीय महाविद्यालय तसेच अभियांत्रिकी मध्ये एनआयटी सीईओपी अशा नामांकित महाविद्यालयात निवड झालेली असून लडकत स्कूल मध्ये वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या पूर्व परीक्षा नीट तसेच जेईई साठी दोन वर्षाचा सीबीएसई पॅटर्न वर आधारित कॉलेज सहित कोचिंग प्रोग्राम राबला जातो. त्याचे प्रवेश सध्या सुरू असून लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनमध्ये ,प्री प्रायमरी ते १२वी सायन्स पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. इयत्ता ५वी पासूनच विद्यार्थ्यांची मेडिकल आणि इंजिनीअरिंग संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली जाते. प्रि प्रायमरी सेक्शन मध्ये सीबीएसई आधारित अभ्यासक्रम शिकवला जातो मुलांना खेळांसाठी प्रशस्त मैदान उपलब्ध आहे , १ ली ते १३वी साठी लातूर कोटा पुणे येथील तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, कॉम्पुटर लॅब, सायन्स लॅबोरेटरी, प्रशस्त मैदान आणि निसर्गरम्य वातावरण उपलब्ध आहे. नीट जेईई साठी स्वतंत्र कोचिंग सेंटर उपलब्ध आहे . विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आदर्श विध्यार्थी तसेच आदर्श नागरिक घडावणे हेच संस्थेचे ध्येय असल्याचे प्रा नामदेव लडकत यांनी सांगितले.
