उद्योगव्यवसायिकांना अर्थसाक्षर करण्यासाठी प्रयत्न करणार – सुशिलकुमार सोमाणी

सुशील कुमार सोमाणी यांचा सत्कार करताना बिडाचे पदाधिकारी

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती: प्रतिनिधी)
बारामती एमआयडीसी व परिसरातील उद्योजक निरंतर कष्ट करून व कल्पकतेने उद्योग व्यवसाय करून चांगले अर्थार्जन करत आहेत परंतु योग्य माहिती अभावी आर्थिक नियोजन त्यांना करता येत नाही. अशा उद्योजकांना कायदेशीर तरतुदींचा पुरेपूर वापर करून अधिक प्रभावी आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन बारामतीतील उद्योग व्यावसायिक सुशीलकुमार सोमाणी यांनी दिले.
कॉसमॉस बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य म्हणून सुशीलकुमार सोमाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्ताने बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य मनोज पोतेकर व हरिश्चंद्र खाडे व इतर उद्योजक उपस्थित होते
आर्थिक शिस्त व नियोजन नसलेने अनेक उद्योजक अवाजवी कर भरत आहेत तसेच त्यांनी अयोग्य ठिकाणी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीमुळे ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे उद्योजकांना अर्थसाक्षर करण्यासाठी सुशीलकुमार सोमाणी यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा धनंजय जामदार यांनी व्यक्त केली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!