
प्राध्यापक नितीन नाळे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३०):- प्राध्यापक नितीन नाळे हे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेली 25 वर्ष भूगोल व सहकार विषयाचे अध्यापन करीत आहेत याचबरोबर काव्यरचना करणे व्याख्याने देणे निवेदन करणे गाणी लेखन करणे आदीमध्ये त्यांनी आपली एक उत्तुंग भरारी घेतली आहे नुकताच त्यांना त्यांच्या आज अखेर महाराष्ट्रभर सादर झालेल्या 1467 व्याख्यानाची नोंद घेऊन केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण व विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ श्रीरंग बारणे लक्ष्मीची पावले फेम ध्रुव दातार यांच्या हस्ते 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचा औचित्य साधून राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्काराने गौरवण्यात आला दिनांक 21 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी सरांना निमंत्रित कवी म्हणून दिल्ली येथे आपली पर्यावरणीय फटका ही वैश्विक समस्या प्रकट करणारी कविता सादर करण्याची संधी लाभत आहे सातारा जिल्ह्याच्या या सुपुत्रास कौतुकाचा वर्षाव होत आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय सहकार कृषी अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्राध्यापक नितीन नाळे यांचे कौतुक केले आहे व खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत
