जायंटस् ग्रुप ऑफ फलटणतर्फे महिलांसाठी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३१) :-

जागतिक कर्करोग दिनानिमित्त मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी जायंटस् ग्रुप ऑफ फलटणतर्फे महिलांसाठी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, युनिट डायरेक्टर शांताराम आवटे यांनी दिली.

सदरचे शिबीर मुधोजी क्लबशेजारील कनकवंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत संपन्न होणार असून या शिबीरात शरीरावरील चरबीच्या, घामाच्या व इतर गाठी, गर्भाशयाच्या गाठी, स्तनांवरील गाठी आदींची मोफत रोगनिदान तपासणी करण्यात येणार असून शिबीरात नोंदणी करणार्‍या रुग्णांना शस्त्रक्रियेत 50% सवलत हॉस्पिटल प्रशासनाडून मिळणार आहे. तरी फलटण व परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी 8382058205 या क्रमांकावर पूर्व नोंदणी करावी व या शिबीराचा लाभ घ्यावा, असेही आवाहन शांताराम आवटे यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!