२०२५ महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ
फलटण टुडे वृत्तसेवा (अहिल्यानगर दि ०२) :-
रविवार दि. ०२फेब्रुवारी रोजी अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहोळने अंतिम फेरीत बाजी मारत ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली आहे.
पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पैलवान पृथ्वीराज मोहळला चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली आहे. पृथ्वीराज मोहळने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.
६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादेचा मानकरी ठरला पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ
उपमहाराष्ट्र केसरी ठरला सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड