
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. पोपटराव वाबळे
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):-
दि. ३१जानेवारी, रोजी सद्गुरू वामनराव पै शिक्षण संस्था, कटफळ संचालित चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांसाठी योग, ध्यान आणि त्याचे फायदे यावर कार्यशाळा आयोजित केली होती.
योग प्रशिक्षक आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग शिक्षक प्रा. पोपटराव वाबळे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
योगशिक्षण आत्म-शिस्त आणि आत्म-नियंत्रण करण्यास मदत करते, ज्यामुळे जागरूकता, एकाग्रता आणि उच्च स्तरावरील चेतना निर्माण होते तसेच शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित योग आणि ध्यान करणे गरजेचे आहे असे त्यांनी या कार्यशाळे दरम्यान सांगितले.
संस्थेचे संस्थापक आणि विश्वस्त नानासाहेब मोकाशी यांनी प्रा. वाबळे यांचे स्वागत केले. विस्वस्त संगीता मोकाशी, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. विनोद पवार, विभाग प्रमुख प्रा. हेमंत भोसले समन्वयक प्रा. पल्लवी कांबळे सोबत अजितदादा इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रशांत वणवे उपस्थित होते सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.
