
उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांच्या हस्ते मॉर्डन किचनचा उद्घाटन समारंभ संपन्न
मॉर्डन किचन चा उद्घाटन समारंभ अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होताना अमोल माघाडे व निखिल सोडमिसे
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ):-
अत्याधुनिक तंत्रज्ञान युगात किचन, बेडरूम ,हॉल कसे हवेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे मॉर्डन किचन असून
आधुनिक बारामतीच्या वैभवात भर घालण्याचे काम मॉडर्न किचनच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शनिवार दि.१फेब्रुवारी रोजी भिगवण रोडवरील मॉर्डन किचन चा उद्घाटन समारंभ अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी ते उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत होते याप्रसंगी फलटण कोरेगाव चे आमदार सचिन पाटील ,तालुका राष्ट्रवादीचे मा अध्यक्ष संभाजी होळकर ,शहर अध्यक्ष जय पाटील तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव माळेगावचे संचालक योगेश जगताप,नितीन जगताप,बँक संचालक उद्धव गावडे व क्रेडाई चे अध्यक्ष राहुल खाटमोडे,मा. नगरसेवक सुधीर पानसरे
व फलटण बिल्डर असो अध्यक्ष प्रमोद निंबाळकर व दिलीप शिंदे, विक्रम झांजुर्णे ,रणधीर भोईटे, किरण दांडीले,डॉ प्रसाद दोशी,मा. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते,सुभाष नरळे आदी व विविध क्षेत्रातील मान्यवर,ग्राहक उपस्थित होते.
ग्राहकांना गुणवत्ता व दर्जा देत संतुष्ट ग्राहक हीच आमची ओळख मॉर्डन किचन ने केलेली आहे त्यामुळे बारामतीकरांच्या पसंतीस मॉर्डन किचन पडेल आणि अमोल व निखिल यांनी केलेल्या व्यवसाय कौतुकास्पद असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर फलटण बाणेर आंबेगाव कात्रज या ठिकाणी ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून बारामती शाखा सुरू केली असून मोठ्या शहरांमध्ये न जाता ग्राहकांना बारामती मध्ये सर्व सेवा सुविधा मिळाव्यात आणि ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचनार असून गुणवत्ता दर्जा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मॉर्डन किचनचे संचालक अमोल माघाडे व निखिल सोडमिसे यांनी दिली.
उपस्तितांचे स्वागत अमोल माघाडे, निखिल सोडमिसे, तुळशीराम माघाडे मुकुंद सोडमिसे,जालिंदर माघाडे आदींनी केले.
याप्रसंगी आर्किटेक्ट श्री व सौ भोसले,जागा मालक महेश गवसने व कंपनीचे अधिकारी घनश्याम निकम अश्विन कुमार यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले .
