
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०२):-
रविवार दि ०२ रोजी दुपारी फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बारामती चौक पूला जवळ झालेल्या अपघातात एक ट्रकचालक मयत झाला आहे त्याबाबत फलटण शहर पोलीस ठाणे अपराध क्रमांक 45/2025 भा.न्या.सं कलम 106(1), 281, 125(a), 125(b), मो.वा.का. कलम 134(a), 134(b),
184 प्रमाणे. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
सदर गुन्ह्यातील ट्रकचालक मुस्ताक जमाल खान वय 37 राहणार फिरोजपुर तालुका मेवात हरियाणा हा बारामतीकडून फलटण कडे येत असताना बारामती पुलाचे अली कडे कॅनॉल जवळ आज दिनांक 02/02/2025रोजी दुपारी 2.45 वा. चे दरम्यान त्याचे ताब्यातील लेलँड कंपनीचा ट्रक नं. NL.01 AH.7903 यामध्ये बारामती येथून वेस्पा कंपनीच्या मोटारसायकल भरून तो गोवा येथे निघाला असताना बारामती पुल फलटण येथे त्याने ट्रकच्या उजव्या साईटने बाहेर डोकावून पाहिले असताना समोरून एका अज्ञात पिकअप सारख्या दिसणाऱ्या वाहनावरील अज्ञात चालक (गाडी नंबर माहित नाही) याने मुस्ताक याचे तोंडाला, डोक्याला जोराची धडक दिल्याने त्यास गंभीर जखमी करून अज्ञात पिकअप सारख्या दिसणाऱ्या वाहनावरील वरील अज्ञात चालकाने हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मुस्ताक खान यास जोरात धडक देवुन गंभीर जखमी करून त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे. तसेच अपघाताची खबर न देता, जखमीस औषधोपचारास न घेवुन जाता पिकअपसह पळुन गेला आहे.
खलील इसाक खान राहणार हरियाणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात पिकअप चालका विरूध्द अपराध दाखल करण्यात आलेला आहे
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे नेमणूक फलटण शहर पोलीस ठाणे हे करीत असून संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी आजूबाजूचे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस व सीसीटीव्ही तपासणी बीट अंमलदार यांच्या सोबत करण्यात येत आहे.अशी माहिती यशवंत नलावडे पोलीस निरीक्षक गुन्हे फलटण शहर पोलीस ठाणे यांनी दिली
