बारामतीत ‘नवयुग’ अंतर्गत मानसिक आरोग्य जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

विद्या प्रतिष्ठान येथे रॅलीचा शुभारंभ करताना उपस्थित मान्यवर व विद्यार्थी

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती: प्रतिनिधी):-
मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “नवयुग – शोध नव्या मानसिकतेचा” या उपक्रमांतर्गत “मानसिक आरोग्य जनजागृती रॅली” बारामतीत उत्साहात पार पडली.
या उपक्रमाचे आयोजन नवयुग संघटनेच्या मानसोपचारतज्ञ सोनाली खाडे, पूनम गुप्ता, रेजशा खान, मयुरी खरात आणि विद्या प्रतिष्ठान माजी विद्यार्थी संघटनेच्या भगवान चौधर, संजय देवगुडे, नितीन सातव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विद्या प्रतिष्ठान आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, बारामतीचे प्राचार्य डॉ भारत शिंदे,इतर सर्व प्राचार्य, कर्मचारी त्याचबरोबर शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ निंबाळकर , तसेच तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रॅलीची सुरुवात विद्या प्रतिष्ठान गेट क्रमांक १ येथून झाली. पेन्सिल चौक, सिटी इन चौक, सुर्यनगरी, गदिमा रोड मार्गे जात विद्या प्रतिष्ठान ग्राउंड येथे समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर्स आणि घोषणांच्या माध्यमातून “मानसिक आरोग्य हेच खरे आरोग्य”, “तणाव मुक्त जीवन – आनंदी जीवन”, “मन मोकळे करा, तणाव दूर करा” व उत्कृष्ट प्रथनाट्य ज्या मधून समाजाला सुंदर संदेश पाठवण्यात आला यासारख्या संदेशांद्वारे जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमाला विशेष सन्मान देत उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. सुधर्शन राठोड यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकत, “तणाव आणि चिंता यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. समाजाने याकडे गांभीर्याने पाहून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात बारामती ट्रॅकर्स क्लब आणि ऍड सचिन वाघ , सेव्हन स्टार आयकॉन, योद्धा स्पोर्ट्स अकॅडमी, वेक्टर ग्राफिक्स, आर्टिस्ट ग्राफिक्स, डिस्प्ले प्रमोशन आणि स्वयंप्रेरणा अकॅडमी या संस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!