फलटण:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ ची मुधोजी हायस्कूल
व ज्युनि. कॉलेज फलटण केंद्र क्र. ०१०१ येथे विज्ञान शाखेची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होत आहे. मुधोजी हायस्कूल फलटण येथे विज्ञान शाखेच्या X013168 ते
X014000 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे
प्रवेश पत्र ( रिसीट), ओळख पत्र व लेखनसाहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धातास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणा-या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला
जाणार नाही. विद्यार्थ्यांने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने / उपकरण परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पार
पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राचार्य श्री. शेडगे व्ही. के., केंद्रप्रमुख श्री. माने एस.एस., माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री. जगताप एन.एम. पर्यवेक्षिका सौ. पाटील पी.व्ही. यांनी केले आहे.
इ. १२वी बोर्ड परीक्षा फेब्रु मार्च २०२५ मुधोजी हायस्कूल, फलटण (विज्ञान शाखा) ०१०१ केंद्राची बैठकव्यवस्था
