फलटण : श्रीमंत संजीवराजे (बाबा) ऍक्टिव्ह मोड मध्ये…मनासारखा राजा…राजा सारखे मन…गोविंद मिल्कच्या अनुषंगाने गेली पाच दिवस श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर येताच हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडून वयाची ७५ वी पूर्ण केलेले जेष्ठ पत्रकार श्री.अरविंदभाई मेहता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या पत्रकार कॉलनी, फलटण येथील निवासस्थानी पोहचले व शुभेच्छा दिल्या, यातूनच त्यांची समाजा प्रती असलेली आस्था व प्रेम दिसून आले, धडाडीचे असलेले श्रीमंत नेतृत्व यालाच म्हणावे लागेल, एवढ्यावरच न थांबता ते मुधोजी क्लब येथे डॉक्टरांच्या सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थिती राहिले, नंतर श्री.सुरेंद्र सहस्त्रबुद्धे यांचे सुपुत्र सुदीप आणि श्री.कैलासचंद्र कचरे यांची सुकन्या श्रेया यांच्या सजाई गार्डन येथील स्वागत समारंभास उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले.


